स्कार्पीओ व दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यु, एक जखमी

शहरातील सुमठाणा परिसरातील घटना

अतुल कोल्हे, भद्रावती : गाडी वळवितांना मागुन येणाऱ्या स्कार्पीओ गाडिची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसुन असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. सदर घटना रविवारला शहरातील सुमठाणा परिसरात भद्रावती-चंद्रपूर हायवेवर घडली. शंकर धोंडूजी निकुरे राहणार जळका खरवड असे मृतकाचे नाव आहे. या अपघातात कार्तिक मोहुर्ले हा ईसम गंभीर जखमी झाला.

जखमीला उपचारासाठी चंद्रपुर येथे हलविण्यात आले आहे. मृतक तथा जखमी कार्तिक मोहुर्ले हे दोघे आपल्या गावावरुन चंद्रपुर येथे काही कामानिमित्त आपल्या एम एच ३४बि डब्लु ३४४९ या क्रमाकाच्या दुचाकीने चालले होते.भद्रावती शहरातील सुमठाणा परिसरात असतांना त्यांनी गाडी वळविली त्याच वेळेस मागुन येणाऱ्या एम एच ०५सि एम १५१४ या स्कार्पीओ गाडिची जोरदार धडक बसली त्यात दुचाकीवर मागे बसलेला शंकर धोंडूजी निकुरे याचा जागीच मृत्यु झाला. घटनेचा तपास भद्रावती पोलिस करीत आहे.