विद्यार्थ्यांना शालेय वस्तु व खाउचे वाटप

एल्गार प्रतिष्ठाणचा उपक्रम

मूल (प्रतिनिधी) : बालक दिनांचे निमीत्ताने आज (14 नोंव्हेबर) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितेगांव येथे एल्गार प्रतिष्ठाणचे वतीने शालेय विद्यार्थाना शालेय वस्तू व खाउचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साामाजीक कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी होत्या. यावेळी मुख्याध्यापक वाकडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शेवंता सोनुले, माजी सरपंच हरीदास गोहणे, सामाजिक कार्यकर्ते विजय सिध्दावार, अमर कड्याम आदी उपस्थित होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी अॅड. पारोमिता गोस्वामी, विजय सिध्दावार यांनी बालकदिनाचे निमीत्ताने विद्यार्थाना मार्गदर्शन केले. उपस्थित पाहुण्यांचे हस्ते 133 शालेय विद्यार्थ्याना परिक्षा पॅड व खाउचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शालेय विद्यार्थीनीनी केले. शाळेच्या विद्यार्थ्याना शालेय वस्तू दिल्याबद्दल मुख्याध्यापक वाकडे यांनी एल्गार प्रतिष्ठाणचे आभार मानले.