महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तळोधी (प्रतिनिधी) : नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिंधिचक येथिल एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (ता. 18 नोव्हेंबर) रोजी उघडकीस आले आहे. ममता विकास दोडके वय 35 वर्षे रा. तुकूम (तिवर्ला) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नांव आहे.

नागभिड तालुक्यातील तुकूम (तिवर्ला) येथील ममता विकास दोडके वय 35 वर्षे ही मागील 1 महिण्यापासुन चिंधीचक येथील बहिणीकडे राहात होती, काही दिवसांपासुन ती वेडसरपणे वावरत होती, दरम्यान काल (17 नोव्हेंबर) पासुन सदर महिला घरून बाहेर निघाली, तिचा काल पासुन शोध घेत होते. मात्र आज दुपारी तिचा मृत्यूदेह प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चिंधिचक जवळील विहिरित तरंगताना आढळून आले. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. असता पोलिस घटनास्थळी येवून शव विहिरीतुन बाहेर काढुन शवविछेदनासाठी नागभिड येथे हलविण्यात आले पुढिल तपास नागभिड पोलीस करीत आहेत.