सत्य बातमीला प्राधान्य द्या: ॲड. फिरदोस मिर्झा

डिजीटल मिडीया पत्रकारांची कार्यशाळेत प्रतिपादन

मूल (प्रतिनिधी) : वाचक बातमीच्या शोधात नेहमीच असतात, तात्काळ आणि सत्य बातमी वाचकांना कशी देता येईल यासाठी डिजीटल मिडीयाच्या प्रतिनिधीनी प्रयत्न केला पाहिजे, केवळ ब्रेकिंग बातमी म्हणुन चुकीची बातमी देण्यात येवु नये, सत्य बातमीला प्राधान्य द्या असे प्रतिपादन डिजिटल मिडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ॲड फिरदौस मिर्झा यांनी व्यक्त केले. ते मूल तालुक्यातील चितेगांव येथे आयोजीत केलेल्या डिजिटल मिडियाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन मंुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे विधीज्ञ ॲड. आनंद देशपांडे, अधिवक्ता ॲड. डॉ. कल्याणकुमार, श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष ॲड. . पारोमिता गोस्वामी, गडचिरोली हितवादचे पत्रकार रोहिदास राउत, डिजीटल मिडीया असोशिएशनचे अध्यक्ष जितेंद्र चोरडीया उपस्थित होते.

यावेळी ॲड. आनंद देशपांडे, ॲड. डॉ. कल्याणकुमार, ॲड. पारोमिता गोस्वामी, आणि पत्रकार रोहिदास राउत यांनी मार्गदर्शन केले. दुपारीच्या सत्रात पत्रकार देवनाथ गंडाटे यांनी डिजीटल मिडीया व न्युज पोर्टल नोंदणी याविषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.

उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिजीटल मिडीया असोशिएशनचे अध्यक्ष जितेंद्र चोरडीया यांनी केले, संचालन विजय सिध्दावार यांनी केले तर उपस्थिताचे आभार दिनेश एकवनकर यांनी मानले. दोन दिवशीय अधिवेशनाला चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथील डिजीटल मिडीयाचे पत्रकार उपस्थित होते.
दिनांक 19 नोव्हेंबर 2022