अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटाचा मृत्यु#Death of a leopard

बल्लारपूर (प्रतिनिधी) : चंद्रपुर मार्गावरील भिवकुंड येथील निर्मल धाबा जवळील नाल्या जवळ रविवारी रात्रौच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी जातीच्या 3 ते 4 वर्षे वयाचा बिबट मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली. Death of a leopard

चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणावर वन्यप्राण्यांचे वावर आहे, रविवारी रात्रौच्या दरम्यान चंद्रपूर मार्गावरील भिवकुंड येथील निर्मल धाबा जवळील नाल्याजवळ एका मादी जातीचे बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमृखी पडल्याची माहिती बल्लारपूरचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे यांनी माहिती झाली, माहितीच्या आधारे त्यांनी अधिनस्त कर्मचाÚयांना घेवुन घटनास्थळी दाखल झाले, दरम्यान मृत बिबटयाचा शवाचा मौका पंचनामा करुन शवास ताब्यात घेतले . बिबट या वन्यप्राण्याच्या डोक्याला जबर मार लागुन मोठया प्रमाणात रक्त स्त्राव झाल्यामुळे सदर वन्यप्राणी मृत पावल्याबाबत प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे दिसून आले. बिबट ही मादी असुन तीचे वय अंदाजे 3 ते 4 वर्ष इतके आहे . बिबट वन्यप्राण्याचे शव डिप फ्रिजर मध्ये ठेवण्याकरीता वन्यजिव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बिबट वन्यप्राण्याचे शवविच्छेन वन्यजीव उपचार केन्द्र , ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे करण्यात येणार आहे .

सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभागाच्या उपसनसंरक्षक श्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे करीत आहे .

यावेळी वनरक्षक वर्षा पिपरे, एस . एम . बोकडे, टि.ओ. कामले व ए . एम . चहांदे उपस्थित होते.