पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत युवक ठार

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : दुध आणण्यासाठी मालडोंगरी येथे जावुन परत येत असताना पिकअपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना मालडोंगरी रोडवर सोमवारी (दि. 21 नोव्हेंबर) रोजी सकाळच्या सुमारास घडली. करण धनीराम माकडे वय 24 वर्षे रा. झिलबोडी असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नांव आहे.

तालुक्यातील झिलबोडी येथील करण धनीराम माकडे वय २४ वर्षे हा सोमवारी (दि. 21 नोव्हेंबर) रोजी सकाळी मालडोंगरी येथुन मावशीकडुन दुध आणण्यासाठी गेला होता, परत मालडोंगरी जाताना समोरून पिकअपने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनास्थळावर पोलीस पोहचुन मुत्युदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.