मतदार यादीत नाव नसलेला शेतकरीही लढु शकतो निवडणुक

महाराष्ट्र शासनाचा नविन अध्यादेश 

मूल (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक मतदार यादीत नाव असल्याशीवाय कोणालाही निवडणुक लढता येत नाही, मात्र 22 नोव्हेंबरच्या एका अध्यादेशानुसार मतदार यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लढता येणार आहे, सदर अध्यादेशामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे.

चंद्रपूर जिल्हयातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपलेला आहे, त्यादृष्टीने प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झालेली असतानाच 22 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी याांच्या आदेशानुसार नविन अध्यादेश काढण्यात आलेला आहे. सदर अध्यादेशामध्ये कलम 13 च्या पोट कलम (1) च्या खंड (अ) मधील इतर निकषांची पुर्तता करतात अशा बाजार क्षे़त्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे नांव मतदार यादीत आहे किंवा नाही हे विचारात न घेता कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लढविण्याची तरतुद सदर अध्यादेशात केली आहे.

निकषांची पुर्तता करणाऱ्या, बाजार क्षेत्रात राहणाऱ्या सर्व शेतकऱ्याना कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणुक लढविणे शक्य व्हावे यासाठी अधिनियमाच्या कलम 13 च्या पोट कलम (1) च्या खंड (अ) मध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर अध्यादेशामुळे सामान्य शेतकऱ्याला निवडणुकीत भाग घेता येत असल्याने शेतकऱ्यानी आनंद व्यक्त केला आहे.