नदीत ट्रक कोसळुन चालक ठार

बल्लारपूर (प्रतिनिधी) : राजुरा ते बल्लारपूर मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या पुलावरून सोमवारी 28 नोव्हेंबरला पहाटेच्या दरम्यान आयसर ट्रक पाण्यात कोसळला. या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाला आहे. बल्लारपूर पोलीसांनी या ट्रक मधुन एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे.

वर्धा नदीवर असलेले कठडे पावसाळ्यात काढण्यात आले होते. सध्या कठड्याच्या जागी बारीक पाईप लावण्यात आले आहे. पूर्वी हा राज्य मार्ग होता. परंतु आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. याच पुलावरून पहाटे पुलावरील पाईपचे कठडे तोडून तुळशी ट्रान्सपोर्ट कंपनीचा आयसर ट्रक क्रमांक एमएच 34 – बीजी 1106 नदीत कोसळला. या घटनेत ट्रक चालक वैभव पदमोकर, वय 25 याचा मृत्यू झाला. त्याचे शव पोलिसांनी बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. दुर्घटनास्थळ हे वर्धा नदीच्या बल्लारपूर भागाकडे असल्याने या प्रकरणी बल्लारपूर पोलिस यांनी घटनेची नोंद घेतली असून अधिक तपास करीत आहेत.