राजोली-मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक ग्राम पंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात

निधी वाटपातही झाला होता भेदभाव : पुत्रप्रेमापोटी तालुक्यात सर्वाधिक निधी फिस्कुटीला

मूल (प्रतिनिधी) : गेल्यावर्षी पार पडलेल्या ग्राम पंचायतच्या निवडणुकीत राजोली-मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रातील 11 पैकी 7 ग्राम पंचायतवर कॉंग्रेस समर्पित झेंडा फडकविण्यात कॉंग्रेस नेत्यांना यश आले मात्र तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपाच्या मूल तालुकाध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांना स्वतःच्या जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपाच्या ताब्यात असलेल्या ग्राम पंचायत भाजपाच्या ताब्यात घेण्यात यश आले नाही, यामुळे मूल तालुक्यात 18 डिसेंबर रोजी होवु घातलेल्या 7 ग्राम पंचायतच्या सरपंच, सदस्यांच्या निवडणुकीसाठी भाजपा नेते किती प्रयत्न करता याकडे भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मूल तालुक्यातील उश्राळा चक, आकापूर, बाबराळा, बेंबाळ, गडीसुर्ला, बोंडाळा खुर्द आणि चकदुगाळा ग्राम पंचायतची निवडणुक येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे, यापैकी भाजपाकडे 4 तर कॉंग्रेसकडे  3 ग्राम पंचायत ताब्यात होते, होवु घातलेल्या निवडणुकीत भाजपाने प्रयत्न केले तर सर्व ग्राम पंचायतवर आपले वर्चस्व निर्माण करू शकतात.

गेल्यावर्षी राजोली मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रातील भादुर्णा, मोरवाही, राजोली, चिमढा, टेकाडी, कोसंबी, चिखली, चितेंगाव, मारोडा, डोंगरगांव आणि करवण या ग्राम पंचायतची निवडणुक पार पडली, यापैकी 7 ग्राम पंचायतवर कॉंग्रेस समर्पित झेंडा फडकला आहे, गेल्या महिण्यात तालुक्यातील ताडाळा, टोलेवाही आणि भगवानपूर  ग्राम पंचायतची निवडणुक पार पडली, यावेळी केवळ भगवानपूर ग्राम पंचायतवर भाजपाला यश आले, मूल तालुक्यात भाजपाचे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष, तत्कालीन पंचायत समिती सदस्य, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य असतानाही भाजपावर ही वेळ का यावी याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतण करण्याची गरज आहे.

भाजपाच्या मूल तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष संध्याताई गुरूनुले हया राजोली मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रातुन निर्वाचीत झाल्या होत्या, मात्र त्यांचे विशेष लक्ष सुपुत्र सरपंच असलेल्या फिस्कुटी या गावाकडे जास्त असल्याचे दिसून येते. निधी वाटपातही फिस्कुटी या गावावरच विशेष लक्ष दिल्याने मूल तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतवर कॉंग्रेस पक्षाने मुसंडी मारली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मूल तालुक्यात होवु घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीकडे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष दिल्यास भाजपाचा बालेकिल्ला शाबुत राहु शकतो ऐवढे मात्र निश्चित.