विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू

बल्लारपूर (प्रतिनिधी) : येथील वस्ती विभागातील महात्मा गांधी पुतळ्याचे मागे ,मोगरे यांच्या घरापुढील विद्युत डीबी जवळ गेलेल्या गाईला विजेचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना सोमवारी सकाळी सात वाजता चे दरम्यान घडली.

रविवारचे रात्रोला बल्लारपुरात पावसाने हजेरी लावली होती. त्यात डीबी ओली झाली .यामुळे विज लिकेज होऊन हा अपघात घडला असावा असे बोलले जाते. याच ठिकाणी एक कार उभी होती .घटनेची माहिती मिळताच विद्युत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून विद्युत पुरवठा बंद केला. यापूर्वीही याच परिसरात दिड महिना पूर्वी विजेचा धक्का लागून एक गाय ठार झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.