कृषक विद्यालयाची शालेय स्पर्धात विभागीय स्तरावर गरुड झेप

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : कृषक विद्यालय चौगानने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर यथोचित यश संपादन करीत विभाग स्तरावर भरारी घेतली आहे.

कृषक विद्यालयाचे नाव लौकिक करीत विभाग स्तरावर झेप घेतलेल्या नंदिनी ताराचंद मैदं हिने 300 मीटर व 800 मीटर धावणे स्पर्धा यात प्रथम क्रमांक तरं रिले स्पर्धेत सुध्दा प्रथम क्रमांक मिळवत कृषक विद्यालय चौगान हे नाव जिल्हा स्तरावर अधोरेखित केले. ओंम दिवाकर सहारे हा 100 मीटर धावणे स्पर्धा यात प्रथम क्रमांक पटकावत विभाग स्तरावर पोहचला तर साक्षी शामराव मैदं हिने 800 मीटर व 200 मीटर धावणे स्पर्धा यात द्वितीय तर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. माणसी संजय मैदं ह्या विद्यार्थिनीने 3 की. मी. चालणे स्पर्धा यात प्रथम क्रमांक पटकावला तर जागृती श्रीहरी बुराडे, साक्षी गिरीधर मैदं यांनी रिले स्पर्धेत सहभागी होत क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यावर शाळा, गावकरी यांच्याकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टीचर करिअर एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्यांनी कायमच अगदी स्थापनेपासून तर आजतागायत खेळ तथा विविध उपक्रमांना प्रोत्साहित करीत विद्यार्थी तथा शिक्षकांना प्रेरित केले आहे. प्रत्यक्ष मैदानावर विद्यालयाचे शिक्षक भोजपाल गाहाने, अंबरदास दोनाडकर, गणेश मलोडे आणि अरुण चचाने यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावून विजयश्री खेचून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली.

शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद मैदं, पर्यवेक्षक दीपक सहारे तथा सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.