सिकलसेल जनजागृती मार्गदर्शन रॅलीने मूल शहर दुमदुमले

उपजिल्हा रूग्णालयाचा पुढाकार

मूल (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस सिकलसेल हे अनुवांशिक आजार वाढत आहे, यावर आळा घालण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाच्या वतिने जागतिक सिकलसेल सप्ताहानिमीत्य नवभारत विद्यालयात सिकलसेल जनजागृती सभा घेण्यात आली व रॅली काढण्यात आली, सदर रॅलीने मूल शहर दुमदुमले.

नवभारत विद्यालयातुन काढयात आलेल्या रॅलीला प्राचार्य अशोक झाडे यांनी हिरवी झेंडी दाखविली, यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर, नवभारत विद्यालयाच्या एनसिसी विभागाचे प्रमुख मोडक, सहा. शिक्षीका वर्षा भांडारकर, उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ अश्विनी यंबरवार उपस्थित होते.

या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सिकलसेल आजाराविषयी विविध घोषणा देत हि रॅली शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. त्यासोबत मूल येथील सेंट अॅन्स हायस्कुल येथील विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी, गरोदर मातांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांना सिकलसेलविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शेकडो विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.