प्रभा आयुर्वेद रथयात्रा व आयुर्वेद शिबीराचे आयोजन

35 जिल्हयातुन रथयात्राचे भ्रमण

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पंचकर्म व आयुर्वेद शिकविणारे व महाराष्ट्रात घराघरात आयुर्वेद पोहचविणारे कै. वैद्य प्र. ता. जोशी (नाना) यांच्या स्मृती प्रित्यर्थ दि. २ डिसें. २०२२ ते दि. ५ जाने. २०२३ पर्यंत प्रभा आयुर्वेद रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात जात असून ब्रम्हपुरी येथे दि. २३ डिसेंबरला येत आहे.

या रथयात्रेचा उद्देश जनसामान्यापर्यंत आयुर्वेद व पंचकर्म पोहचवणे हा आहे. लातूरचे डॉ. दत्तात्रय दगळगावे यांच्या संकल्पनेतून या आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. (हर दिन हर घर आयुर्वेद, घर घर आयुर्वेद) ही रथयात्रा देलनवाडी वार्ड ते श्री गजानन आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक (डॉ. नरेश देशमुख) आरमोरी रोड पर्यंत असेल. या रथयात्रेत विविध वनस्पतीचे दर्शन, रोग प्रतिबंधक काढा यांचे वाटप तसेच वातव्याधी व त्वचारोग यासाठी निःशुल्क शिबीर ठेवण्यात आले आहे. शिबीरात ७ दिवसाचे औषध तसेच तात्कालिक पंचकर्म (रक्तमोक्षम, अग्निकर्म) संपूर्ण निःशुल्क असेल.

रथयात्रेचे उद्घाटन मा. नगराध्यक्ष सौ. रिताताई उराडे तथा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या रथयात्रेत व शिबीरात पंतजली योग समिती, आर्ट अँड लिव्हिंग, लॉयंस क्लब, ब्रम्हकुमारी संस्था, निमा शाखा ब्रम्हपुरी, न्यु मेड लाईफ अडव्हास पॅथ, स्टेम पोदार स्कुल, निलमोहर नर्सरी, पि.आर.डी. स्पोर्ट क्लब असे अनेक सामाजिक संस्था सहभाग व सहकार्य करणार आहेत.

मोफत शिबीर सकाळी ११ ते २ वा. पर्यंत श्री गजानन आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आरमोरी रोड, ब्रम्हपुरी डॉ. नरेश देशमुख यांचा हॉस्पिटलमध्ये आहे. तरी जास्तीत रुग्णांनी त्यांचा लाभ घ्यावा. असे आवाहन निमा शाखा ब्रम्हपुरीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.

पत्रकार परिषदेत डॉ. नरेश देशमुख रथयात्रा समन्वयक, डॉ. हिरालाल मेश्राम अध्यक्ष निमा, डॉ. स्वेता राखडे सचिव, डॉ. सोनम लिचडे उपाध्यक्ष, डॉ. प्रणय कोसे कोषाध्यक्ष निमा, राहुल जुआरे अध्यक्ष पी.आर.डी. स्पोर्ट, डॉ. सौ. सुनिता देशमुख, श्री रितेश उराडे, रामकुमार झाडे, डॉ. पल्लवी चिलबुले आदी सहभागी होते..