रेल्वेच्या धडकेत तरुणाचा अपघाती मृत्यू

बल्लारपूर (प्रतिनिधी) : बल्हारशाह-चंद्रपूर रेल्वे मार्गांवर विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाजवळ अप रेल्वे रुळावर एका तरुणाचे धडावेगळे झालेला मृत्यूदेह आढळून आला. त्याच्या डोक्याचा छिन्नविछीन्न अवस्थेत भाग विखूरला होता.याची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून तो बल्लारपूर येथील कॅटरिंग व्यवसायिक आहे. ही घटना शनिवारी रात्री 9 वाजता विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकशेजारी अप रेल्वे रुळावर घडली. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे रोहित सुधाकर कटकमवार (वय 26 वर्षे) रा. गोकुलनगर वार्ड बल्लारपूर ता. बल्लारपूर असे नाव आहे.

बल्लारपूर येथील रोहित कटकमवार हा कॅटरिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो विसापूर येथे काही कामानिमित्त विसापूर येथे आला. त्यानंतर तो विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानक परिसरात आला. अचानक अप रेल्वे लाईन वर रेल्वे गाडी आली. त्या रेल्वेखाली येऊन पोल क्रमांक 886 बी/3-886 बी/5 अप या घटनेची माहिती रेल्वे कर्मचारी श्रीकृष्ण उईके यांनी जगमोहन मिना यांना दिली. जगमोहन यांनी रेल्वे पोलीस प्रकाश लाडस्कर यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून विसापूर औट पोस्ट पोलीस चौकीचे जमादार घनश्याम साखरकर यांना देऊन घटनेचा पंचनामा केला.

मृतक रोहित चा भाऊ रणजित कटकमवार यांनी येऊन ओळख दर्शविल्यानंतर त्याचे प्रेत उतरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे हलविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी यु /एस 174 सिआरपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास रेल्वेचे एपीआय प्रकाश लाडस्कर व विसापूर चौकीचे पोलीस कर्मचारी घनश्याम साखरकर करत आहे.