मूल तालुक्यात कॉग्रेसची मुसंडी, भाजपा तिन जागेवर विजय

मूल (प्रतिनिधी) : अतिशय संवेदनशिल म्हणुन गणल्या जाणाऱ्या बेंबाळ ग्राम पंचायतच्या सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे चांगदेव केमेकर विजयी झाले तर 7 सदस्यही विजयही होत बेंबाळ ग्राम पंचायतवर कॉंग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. यासोबतच चकदुगाळाच्या सरपंचपदी प्रिती रमेश भांडेकर, आकापूरच्या सरपंचपदी भास्कर हजारे आणि बाबराळाच्या सरपंचपदी धिरज गोहणे हे कॉंग्रेस समर्पित उमेदवार विजयी झाले तर उश्राळा चकच्या सरपंचपदी प्रियंका लोकनाथ नर्मलवार, गडीसुलाच्या सरपंचपदी शारदा संजय येनुरकर आणि बोंडाळा खुर्दच्या सरपंचपदी सोनल बांगरे हे भाजपा समर्पित उमेदवार विजयी झाले आहे. भाजपाचा गड मानल्या जाणऱ्या मूल तालुक्यात कॉंग्रेसची मुसंडी ही भाजपासाठी संशोधनाचा विषय ठरला आहे.

मूल तालुक्यातील बेंबाळ, गडीसुर्ला, उश्राळा चक, आकापूर, बाबराळा, बोंडाळा खुर्द आणि चकदुगाळा ग्राम पंचायतची निवडणुक 18 डिसेंबर रोजी पार पडली, 20 डिसेंबर रोजी मूल येथील प्रशाासकीय भवनात मतमोजणी पार पडली, यामध्ये मूल तालुक्यातील अतिशय संवेदशिल म्हणुन ओळख असलेल्या बेंबाळ ग्राम पंचायत मध्ये भाजपाची सत्ता होती मात्र यावेळेस नागरीकांनी कॉंग्रेस विचार सरणीच्या नागरीकांनी तयार केलेल्या परिवर्तन पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार चांगदेव केमेकार निवडुन आले, सदस्य म्हणुन चंद्रकांत गोहणे, प्रतिमा भडके, आशा शेेडे, राकेश दहिकर, कविता नंदीग्रामवार, अरूणा गेडाम, विनोद वाढई, शिलाताई कंकलवार, किशोर पगडपल्लीवार, देवाजी ध्यानबोईवार आणि आशा मडावी विजयी झाले.

गडीसुर्ला ग्राम पंचायतच्या सरपंचपदी शारदा संजय येनुरकर हया विजयी झाल्या, सदस्य म्हणुन गोंिवदा निकुरे, करिष्मा वाढई, निशा सोनुले, प्रफुल्ल मोहुर्ले, प्रितम आकुलवार, सुवर्णा आकनपल्लीवार, रविंद्र राउत, विशाखा दुर्गे, जयश्री गुंटीवार हे विजयी झाले.

चकदुगाळाच्या सरपंचपदी प्रिती भांडेकर विजयी झाल्या, सदस्य म्हणुन कपिलदेव सातपुते, आम्रपाली माहोरकर, प्रिया आकेवार, नरेंद्र वाढई, पपीता भांडेकर, दिलीप सातपुते, लता सातपुते विजयी झाले,

बाबराळाच्या सरपंचपदी धिरज गोहणे विजयी झाले, सदस्य म्हणुन ठुमदेव कोरडे, ताई निमगडे, अनिता नाहगमकर, दशरथ ठाकुर, अस्मीना तिवाडे, जिवनदास मेश्राम, सपना गोल्लावार विजयी झाले,

आकापूरच्या सरपंचपदी भास्कर हजारे विजयी झाले, सदस्यपदी महेश उईके, अर्चना उईके, वनिता तिवाडे, साहिल येनगंटीवार, भारती मेश्राम, प्रमोद गेडाम, ज्योती वाघाडे विजयी झाले,

उश्राळा चक ग्राम पंचायतच्या सरपंचपदी प्रियंका लोकनाथ नर्मलवार हया विजयी झाल्या, सदस्यपदी विनोद जिवतोडे, किरणदास कोरडे, सुचिता मानकर, गोपाल मांदाळे, अर्चना दळमळ, उषा गुरनुले, कर्णविर राउत, निता जुमनाके, उज्वला ढोले विजयी झाले.

बोंडाळा खुर्द ग्राम पंचायतच्या सरपंचपदी सोनल बांगरे विजयी झाले, सदस्यपदी जालींद्र बांगरे, रोशना बांगरे, रंजुताई नखाते, पंकज चुनारकर, येवता येरमे, जगदिश बांगरे, जमुनाबाई टेकाम विजयी झाल्या. मूल तालुक्यातील 7 ग्राम पंचायत पैकी 4 ग्राम पंचायतवर कॉंग्रेसचे समर्पीत सरपंचपदाची उमेदवार निवडुण आले आहे तर 3 जागी भाजपा समर्पीत उमेदवार निवडुण आले आहे.

पुतण्या झाला वरचड
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा भाजपाच्या तालुकाध्यक्ष संध्याताई गुरूनुले आणि कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष गुरूदास गुरूनुले हया काकु-पुतण्यानी आपआपल्या पक्षाचा झेंडा ग्राम पंचायतवर रोवण्यासाठी अथक परिश्रम घेतले, शेवटी कॉंग्रेसने 4 ग्राम पंचायतवर विजयी मिळवीत पुतण्या पहिल्याच परिक्षेत वरचड झाल्याची चर्चा रंगु लागली आहे.

गडीसुर्लात कॉंग्रेसचा उमेदवारच नाही?
कॉंग्रेस पक्षाचे जवळपास 23 वर्षे तालुकाध्यक्ष म्हणुन कार्य केलेले, कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर यांच्या गाडीसुर्ला गावातील ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी कॉंग्रेस  पक्षाला उमेदवार मिळाला नाही, कि जाणिवपुर्वक ठेवण्यात आलेला नाही हा संशोधनाचा विषय यानिमीत्ताने चर्चेला येत आहे.