आ. जयंत पाटील यांच्या निलंबनाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

भद्रावती (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आ. जयंत पाटील यांना नागपूर येथील अधिवेशनात अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख आणि तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी निषेध केला आहे.

सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम हे घटनाबाह्य इडी सरकार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात बोलू नये. शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेचे प्रश्न मांडू नयेत आणि बेळगाव सीमावादावरील लक्ष्य विचलित करण्याच्या हेतूने त्यांना सत्ताधाऱ्याच्या आग्रहाखातर अधिवेशना पुरते निलंबित करण्यात आले आहे. असा आरोपही मुनाज शेख आणि सुधाकर रोहनकर यांनी केला आहे.