अस्वलीच्या हल्लात महिला गंभीर जखमी Woman seriously injured in bear attack

Woman seriously injured in bear attack
Woman seriously injured in bear attack

मूल तालुक्यातील मोरवाही येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : लाखोरी तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल Mul तालुक्यातील मोरवाही Morvahi येथे सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. देवकाबाई पत्रुजी झरकर Devkabai Patruji Zarkar वय 55 वर्ष रा. मोरवाही असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नांव आहे. Woman seriously injured in bear attack

मूल तालुका हा मोठया प्रमाणावर जंगलाने व्यापलेला आहे, यापरिसरात वन्यप्राण्यांचीही मोठी रेलचेल असते, यामोसमात शेतकरी लाखोरीचे उत्पन्न घेत असतात, दरम्यान शेतातील लाखोरी तोडण्यासाठी मोरवाही येथील काही महिला शेतावर गेल्या होत्या, यावेळी दबा धरून बसलेल्या अस्वलीने देवकाबाई पत्रुजी झरकर हिच्यावर हल्ला करीत असताना सोबत गेलेल्या महिलांनी आरडाओरड केल्याने अस्वल तिथुन पडुन गेली मात्र अस्वलीच्या हल्लात देवकाबाई झरकर हया गंभीर जखमी झाल्या, त्यांच्यावर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळावर वनविभागाचे कर्मचारी दाखल होवुन पंचनामा केला आहे. Forest department personnel entered the incident site

जखमी महिलेच्या कुटुंबियांना वनविभागाने तात्काळ आर्थीक मदत करावी: सुमित समर्थ
वन्यप्राण्याकडुन वारंवार हल्ले होत असतानाही वनविभाग पाहिजे त्याप्रमाणात लक्ष देताना दिसत नाही, मोरवाही येथील हल्ले करणाऱ्या अस्वलीचा तात्काळ बंदोबस्त करून जखमी महिलेच्या कुटुंबियाना वनविभागाने तात्काळ आर्थीक मदत करावी अषी मागणी राश्ट्रवादी काॅग्रेसचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ sumit samarth यांनी केली आहे.