नौकरीला सेवा म्हणूनच केली -अशोक येरमे

Navbharat Kanya Vidyalaya
Navbharat Kanya Vidyalaya

नवभारत कन्या विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन

मूल (प्रतिनिधी) : आपल्या शालेय जीवनात लागलेल्या नौकरीला आपण सेवा म्हणूनच पाहीलो, त्यामुळे 37 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेत नौकरी करीत असल्यांचे कोणतेही दडपण नव्हते, तर कार्यात आनंदच मिळाला असे उद्गार नवभारत कन्या विद्यालयाचे Navbharat Kanya Vidyalaya सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ कर्मचारी अशोक येरमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. Worked as a service -Ashok Yerme

Navbharat Kanya Vidyalaya1
Navbharat Kanya Vidyalaya1

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार होत्या.

नियत वयोमानानुसार अशोक येरमे हे सेवानिवृत्त झालेत. त्यानिमीत्ताने विद्यालयाचे वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून श्री. येरमे यांचा तर साळी-चोळी देवून त्यांच्या पत्नी मंजूषा येरमे यांचा सत्कार करण्यात आला. यानिमीत्ताने विद्यालयातून बदलून गेलेले पर्यवेक्षक सुधाकर पुराम, संतोष खाडे सर यांचाही शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, पर्यवेक्षक सुधाकर पुराम, जेष्ठ शिक्षक छत्रपती बारसागडे, दिनेश जिड्डीवार, संतोष गवारकर, शैलेश देवाडे, प्रफुल्ल निमगडे, राकेश नखाते, सौ. अर्चना बेलसरे, उज्वला चहांदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक अतुल नौकरकर, धिरज धोडरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन विजय सिध्दावार यांनी तर आभार प्रदर्शन कार्तीक नंदूरकर यांनी केले.