बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस विरूध्द कॉंग्रेस लढत Election to the post of Director of Market Committee

Election to the post of Director of Market Committee
Election to the post of Director of Market Committee

अंतिम क्षणी भाजपा उमेदवारांनी अर्ज घेतले मागे : शेवटच्या दिवशी 53 अर्ज मागे

मूल (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रासाठी अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणुक येत्या 28 एप्रिल रोजी होणार आहे, यासाठी 20 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने आज सुमारे 53 अर्ज मागे घेण्यात आले आहे. 53 applications back on last day सहकारी संस्था मतदार संघातुन निवडणुक लढण्यास इच्छुक असलेल्या भाजपाच्या सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने होवु घातलेली निवडणुक कॉंग्रेस विरूध्द कॉंग्रेस अशीच होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. Election to the post of Director of Market Committee

18 सदस्य संख्या असलेल्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक 28 एप्रिल रोजी होवु घातली आहे. सहकारी संस्था मतदार संघातुन 11, अडत्ये व व्यापारी मतदार संघातुन 2, ग्राम पंचायत मतदार संघातुन 4 आणि हमारी, मापारी मतदार संघातुन 1 संचालक निवडुण दयायचे आहे, यावेळी हमाल मापारी मतदार संघातुन एक संचालक अविरोध निवडुण आलेला आहे. उर्वरीत 17 संचालकासाठी निवडणुक होणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासुन मूल कृषी उत्पन्न बाजार समितीवर संतोष रावत गटाचे वर्चस्व आहे, याबाजार समितीवर संतोष रावत, मोतीलाल टहलियांनी, संजय पाटील मारकवार, राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर यांनी सभापती पद भुषविले आहे. तालुक्यातील बहुतांष सेवा सहकारी संस्थेवर रावत गटाचे प्राबल्य आहे. सहकारी संस्थेची निवडणुक कार्यक्रम जाहिर होण्यापुर्वीपासुनच रावत गटाकडुन संस्थेवर कब्जा मिळविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले जातात, परंतु विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडुन याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याने बोटावर मोजण्याइतकेच भाजपाचे कार्यकर्ते सहकारी संस्थेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. याचाच फटका होवु घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत होण्याची शक्यता असल्यानेच भाजपाचे इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची चर्चा आज प्रशासकीय भवनात ऐकायला मिळत होती. यामुळे 11 उमेदवार असलेल्या सेवा सहकारी मतदार संघात भाजपाचे एकही उमेदवार नाही, यामुळे यामतदार संघात कॉंग्रेस विरूध्द कॉंग्रेस असाच सामना बघायला मिळणार आहे.

अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहकारी संस्था मतदार संघातुन 41 अर्ज, ग्राम पंचायत मतदार संघातुन 9 अर्ज तर अडत्ये व व्यापारी मतदार संघातुन 3 अर्ज मागे घेण्यात आले आहे.