कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची माळ कुणाच्या गळयात? Chairman Election APMC Mul

Chairman Election APMC Mul
Chairman Election APMC Mul

रत्नावार, येनुरकर, कन्नमवारांची चर्चा मात्र हायकमांड म्हणेल तोच होईल सभापती

मूल (प्रतिनिधी) : 18 संचालक असलेल्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीची निवडणुक येत्या 12 मे रोजी होवु घातलेली आहे. पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जवळपास सर्वच संचालक रावत गटाचे निवडुण आलेले आहे, यामुळे हायकमांड म्हणेल तोच मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर विराजमार होणार आहे, सध्यातरी सभापती पदाच्या चर्चेत माजी सभापती राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर आणि राजेंद्र कन्नमवार यांच्या नावाची जोरजार चर्चा आहे. Agriculture Produce Market Committee Chairman Election

सहकार क्षेत्रासाठी अतिशय महत्वाची म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते, मूल तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासुन मूलच्या बाजार समितीवर रावत गटाचे वर्चस्व आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे पासुन तर त्यांचे खंदे समर्थक राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर यांनीही सभापती पद भुषविले आहे. मात्र येत्या 12 मे रोजी होणाÚया सभापतीपदाच्या निवडणुकीत कुणाला सभापती पदाची लॉटरी लागेल हे आता तरी गुलदस्तात आहे. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव तथा माजी सभापती राकेश रत्नावार, तालुका कॉंग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा माजी सभापती घनश्याम येनुरकर, आणि राजकारणातील दिग्गज आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागील 10 वर्षापासुन संचालक म्हणुन यशस्वी कार्यकाळ पार पाडलेल्या राजेंद्र कन्नमवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. Rakesh Ratnawar, Ghanshyam Yenurkar, Rajendra Kannamwar

गेल्या दिड वर्षापासुन मूल नगर पालीकेवर प्रशासकराज सुरू आहे, यामुळे भविष्यात नगर पालीकेची निवडणुक होणार असल्याने नियोजनाच्या दृष्टीने नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या गळयात परत सभापतीपदाची माळ पळयाची शक्यता नाकारता येत नाही, माजी सभापती घनश्याम येनुरकर यांच्याकडील तालुका कॉंग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्षपद गेल्याने सध्या त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही मोठे पद नसल्याने त्यांनाही सभापतीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. परंतु रत्नावार आणि येनुरकर यांनी आधिच सभापती पद भुषविल्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र कन्नमवार यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेगवेगळया कारनाम्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिलेल्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, आणि उपसभापती पदी कोण विराजमान होणार हे मात्र अजुन तरी गुलदस्तात आहे. हे विशेष.