पिपरी दिक्षीत नियतक्षेत्रात वाघाचा आकस्मीक मृत्यु Sudden death of a tiger

Sudden death of a tiger
Sudden death of a tiger

मूल (प्रतिनिधी) : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात अंतर्गत येत असलेल्या पिपरी दिक्षीत Pipri Dixit नियतक्षेत्रातील कक्ष क्र. 543 येथे एका वाघाचा (मादी) आकस्मीक मृत्यु घटना गुरूवारी दुपारी 4 वाजता दरम्यान उघडकीस आली.

मूल तालुक्यातील मौजा बेंबाळ Bembal येथील स्थानिक लोकांकडून वाघ गावाजवळ असल्याचे चर्चा नागरीकांमध्ये सुरू होती, याबाबत स्थानिक वनकर्मचारी यांनी परिसरात जावून पाहणी केली. असता सकाळी वाघाचा वावर दिसून आला. व वाघ जखमी असल्याचे दिसून आले. तेव्हा चंद्रपूर येथील पशुवैद्यकिय अधिकारी यांना वनाधिकाÚयांनी पाचारण करून वाघाची पाहणी केली असता, दुपारी 4 वाजता दरम्यान सदर वाघ मृत्यू पावल्याचे निष्पन्न झाले.

सदरची घटना ही पिपरी दिक्षीत नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 543 येथे घडली. वाघाच्या मृत्यूचे कारण शव विच्छेदन अहवाल नंतरच सांगता येईल अशी माहिती पोंभुर्णा वनविभागाकडुन Pombhurna Forest Division सांगण्यात आले आहे.