झाडीपट्टी रंगभुमीला शक्य ती मदत करू : सांस्कृतिक कार्यमंत्री ना. मुनगंटीवार Padmashri Dr. Parashuram Khune

We will help Zadipatti Rangbhumi as much as possible: namdar Mungantiwar
We will help Zadipatti Rangbhumi as much as possible: namdar Mungantiwar

पद्मश्री डॉ परशुराम खुणे यांचा नागरी सत्कार संपन्न

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्हात कलावंताची मोठी फौज आहे, याजिल्हयातुन अनेकांनी कलावंत म्हणुन नांव मोठे केलेले आहे, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रातील अनेक कलावंत झाडीपट्टी रंगभुमीच्या माध्यमातुन आपली कला सादर करीत आहेत, यामुळे झाडीपट्टी रंगभूमिला शक्य ती मदत करू असे आश्वासन जिल्हयाचे पालकमंत्री राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर फौंडेशन व जलतरण संघटना, मुल यांच्या संयुक्त विधमाणे कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ परशुराम खुणे यांचा जाहिर नागरी सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते. We will help Zadipatti Rangbhumi as much as possible: Cultural Affairs Minister namdar Mungantiwar

We will help Zadipatti Rangbhumi as much as possible: namdar Mungantiwar1
We will help Zadipatti Rangbhumi as much as possible: namdar Mungantiwar1

स्थानिक मा सा कन्नमवार सभागृहात आयोजीत केलेल्या सत्कार समारंभाला जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नाम सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरुनूले, भाजपच्या महीला प्रदेश महामंत्री अल्कांताई आत्राम, मूल नगर पालीकेचे माजी अध्यक्षा रत्नमाला भोयर, कार्यक्रमाचे संयोजक व मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे सामाजिक कार्यकर्त्या किरण कापगते उपस्थित होत्या.

विदर्भाच्या कलावंतांनी पदमश्री सोबतच भारतरत्न कडे वाटचाल करावी अशा शुभेच्छाही नामदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. यावेळी लोककलावंत अनिरुद्ध वनकर यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक मंत्री नामदार मुनगंटीवार यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ परशुराम खुणे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे डॉ राम दांडेकर, आयुर्वेद औषधी देणारे प्रल्हाद कावळे, प्रा डॉ दैवत बोरकर, प्रा डॉ राजश्री मुसतीलवार, प्रा डॉ तरनुम खान, प्रा डॉ विजयसिंग पवार, प्रा डॉ राकेश चडगुलवार, पर्यावरण रक्षक वर्षा भांडारकर, संगीत विशारद प्राप्त कुमुदिनी भोयर, सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले रागिणी उमलवार, ओंकार चनावार, शुभम डांगे यांचा सत्कार करण्यात आला, PadmaShri Dr. Parashuram Khune felicitated

यावेळी मूल येथील झाडीबोली मडळाचे अध्यक्ष सुखदेव चौथाले यांच्या झाडीचा पोहा या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले, सत्काराला उत्तर देतांना डॉ परशुराम खुणे यांनी मुल शहरातील जनतेने केलेल्या सत्काराचा व प्रेमाचा विसर कधीही पडणार नाही व सांस्कृतिक मंत्री नाम सुधीर मुनगंटीवार यांनी कलाकारांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी केली, कार्यक्रमाला झाडीपट्टी कलावंत सदानंद बोरकर, शेखर डोंगरे, के आत्माराम, अरविंद झाडे, हिरालाल पेंटर, संतोष कुमार, सुनिल कुकुडकर, मुकेश गेडाम यांची उपस्थिती होती,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ किरण कापगते यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहुर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय चिंतावार, मनोज रणदिवे, प्रमोद कोकुलवार, सोनू लाडवे, संजय मारकवार, प्रवीण मोहूरले चिमढा, अक्षय गजापुरे, अक्षय गजापुरे, अरुण खोब्रागडे, प्रदून्य कंदीकुरवार, व अनेक कार्यकर्ते यांनी केले
,