राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भटारकर तर शहर जिल्हाध्यक्षपदी कक्कड यांची नियुक्ती Nationalist Congress Ajit Pawar group

Nationalist Congress Ajit Pawar group
Nationalist Congress Ajit Pawar group

प्रदेशाध्यक्षांनी केली नियुक्ती

मूल (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नितीन भटारकर तर शहर जिल्हाध्यक्षपदी राजीव कक्कड यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे sunil tatkare यांनी केली असुन, नियुक्तीचे पत्र त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल पटेल  Praful Patel आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम Cabinet Minister Namdar Dharmaraobaba Atram यांच्या हस्ते नागपूर येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात देण्यात आले आहे. जिल्हयात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे मत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर Nitin Bhatarkar आणि राजीव कक्कड Rajiv Kakkad यांनी यावेळी व्यक्त केले. Nationalist Congress Ajit Pawar group

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ते प्रदेश कार्याध्यक्ष म्हणुन मागील अनेक वर्षापासुन कार्यरत असलेले नितीन भटारकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी अजित पवार गटात प्रवेश घेतला असुन त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेवुन नितीन भटारकर यांना चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केले तर शहर जिल्हाध्यक्षपदी राजीव कक्कड यांची नियुक्ती केली आहे. नागपूर येथे अजित पवार गटाच्या एका कार्यक्रमात नितीन भटारकर आणि राजीव कक्कड यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल पटेल आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.