अखेर विद्युत दिव्याची समस्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नाने सुटली Electric light

Electric light
Electric light

मूल नगर पालीकेनेही दाखविली तत्परता

मूल (प्रतिनिधी): विद्युत खांब लावुनही दिवे लावण्यात नगर पालीका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी नगर पालीकेला निवेदन देवुन आंदोलनाचा इशारा देताच नगर पालीकेने तात्काळ विद्युत दिवे लावल्याने वार्डात सर्वत्र उजेड पसरला  आहे. यामुळे वार्डातील नागरीकांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आभार मानले आहे. NCP Mul

Electric light1
Electric light1

मूल शहरातील वार्ड क्रं. 12 येथील श्री. नागोशे यांचे घरापासुन तर श्री नखाते यांच्या घरापर्यंत नगर परिषदेने विद्युत खांब उभे केले होते. अनेक दिवस लोटुनही सदर खांबावर विद्युत दिवे लावण्यात आलेले नाही, यामुळे नागरीकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती, नागरीकांना होत असलेल्या त्रासाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, शहराध्यक्ष आकाश येसनकर यांच्या नेतृत्वात वार्डातील नागरीकांनी नगर पालीकेला निवेदन देवुन तात्काळ विद्युत दिवे लावुन देण्याची मागणी केली, अन्यथा तिव्र आंदोलन करू अशा इशाराही त्यांनी नगर पालीकेला निवेदनातुन दिला होता, दरम्यान नगर पालीका प्रशासनही तितक्याच तत्परेतेने विद्युुत दिवे लावुन नागरीकांचा अंधाराचा प्रश्न सोडविला आहे. सदर समस्या सोडविल्याबद्दल वार्डातील नागरीकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आभार मानले.