दर्शन वासेकर यांचा पुढाकार
गोंडपिपरी (प्रतिनिधी): तालुक्यातील आक्सापुर येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आक्सापूर येथील शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करुन एक नवा पायंडा पाडला आहे. Distribution of notebooks and pens on birthdays
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल, तालुका काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष महेंद्र कुनघाटकर, ग्रामपंचायत सदस्य नितेश मेश्राम, अनिकेत बुरांडे काँग्रेस शाखाप्रमुख आक्सापुर, विकी शाहू उपस्थित होता. Congess#Shivsena#leaders
आजच्या युगात लोक आपल्या वाढदिवसाला वारे माप पैसे खर्च करतात पण काही लोक पैशाचा उपयोग गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना होउन त्याचा सदुपयोग व्हावा याकरिता प्रयत्न करीत असतात असाच आक्सापुर येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख असलेले दर्शन वासेकर यांनी जिल्हा परिषद शाळा आक्सापुर येथील 105 विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप केले. Darshan Wasekar
वाढदिवसाच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या दर्शन वासेकर हे प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद शाळेत नोटबुकचे वाटप करीत असतात तसेच गावातील शिवाजी चौकात वृक्ष लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे. सदर कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात दर्शन वासेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यानंतर सर्व शिक्षक वृदांनी दर्शन वासेकर याच्या कार्याचा कौतुक करुन अभिनंदन केले बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. Aksapu, Gondpipri