गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी बापू मडावी यांची निवड Bapu madavi

निनाद शेंडे, मूल : गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मुल तालुक्यातील मौजा जानाळा येथील आदिवासी समाजाचे सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ते समाजासाठी धाऊन जाणारे कर्तृत्ववान होतकरू नेते  बापु गणपतराव मडावी यांची गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर निवड केल्याचे पत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश हरिशजी उईकें harish uike यांनी दिनांक २३ ऑगस्टच्या पत्रांन्वये केल्याचे कळविले आहे. Gondvana gantantra parti

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय ध्येय धोरण, प्रचार व प्रसार करून आपल्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी बंधू भगिनींना व युवक कार्यकर्त्यांना सर्वच क्षेत्रात समान संधी व न्याय मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करावे असेही प्रदेशाध्यक्ष यांनी कळविले आहे. श्री.बापूजी मडावी यांची जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. तुलेश्वरर्जी मसराम, प्रदेश अध्यक्ष हरीश उईके यांनी व समस्त प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभिनंदन केले आहे.