मूल तालुक्यातील मरेगांव शेतशिवारातील घटना
निनाद शेंडे
मूल : बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव Mul Maregaon येथील सर्व्हे नं. 111 च्या बाजुला असलेल्या गुरूदास कवडु वाकडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी 1 वाजता दरम्यान घडली. वासुदेव झिवरू पेंदोर वय 60 वर्षे रा. मरेगांव Wasudeo Zivru Pendor असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे. Cowherd killed in tiger attack
मूल तालुक्यातील मरेगांव येथील वासुदेव झिवरू पेंदोर वय 60 वर्षे हे गुरे घेवुन चराईसाठी सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव येथील सर्व्हे नं. 111 च्या बाजुला असलेल्या गुरूदास कवडु वाकडे यांच्या शेतात नेले होते. दरम्यान बाजुला असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. सोबत असलेल्या इतर गुराख्यांनी सदर घटनेची माहिती गावकÚयांना व वनविभागाला दिली. Saoli Forest
वाघाच्या हल्लात शेळीपालक ठार Goat farmer killed in tiger attack
सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला, सावली आणि मूल पोलीस स्टेशनचे Mul & saoli Police कर्मचारीही घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला, व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. Vinod Dhurve
सावली वनविभागाच्या वतिने वाघाच्या हल्लात ठार झालेल्या वासुदेव पेंदोर यांच्या कुटुंबियांना 25 हजार रूपयाची तात्काळ आर्थीक मदत करण्यात आली. मूल तालुक्यात वाघाच्या हल्लाच्या घटनतेत वाढ होत आहे. यामुळे गावकरी भयभित झालेले आहे.