सावली तालुक्यातील बोथली येथील घटना
सुधाकर दुधे, सावली : हिरापूर येथे नाटक बघण्यासाठी जात असताना दुचाकी आणि टॅªक्टरच्या अपघात तिंघांचा मृत्यु झाल्याची घटना मार्कंडेय विद्यालयाजवळ 27 नोव्हेंबर रोजी रात्रौ 9 वाजता दरम्यान घडली. याअपघातात हर्षल संदिप दंडावार रा. बोरचांदली वय 21 वर्षे हा जागीच ठार झाला तर साहिल नंदु गणेशकर रा. भंगाराम तळोधी वय 20 वर्षे, साहिल अशोक कोसमशिले रा. बोथली वय 19 वर्षे याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. Three killed in accident

सावली तालुक्यातील बोथली येथील साहिल अशोक कोसमशिले याला भेटण्यासाठी हर्षल संदिप दंडावार व साहिल नंदु गणेशकर हे दुचाकी क्रमांक एम एच 34-एल-3229 ने बोथली येेथे आले होते. तिघेही मित्र रात्रौ 9 वाजताच्या दरम्यान दुचाकीने हिरापूर येथे नाटक बघण्यासाठी जात होते. दरम्यान मार्कंडेय विद्यालयाजवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34-ए पी-1042 वळण करीत असतांना दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिली. याअपघातात हर्षल संदिप दंडावार हा जागीच ठार झाला तर साहिल नंदु गणेशकर आणि साहिल अशोक कोसमशिले गंभीर जखमी झाले. जखमींना सावली ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथे नेत असतानाच साहिल नंदु गणेशकर याचा वाटेत तर साहिल अशोक कोसमशिले याचा उपचारादरम्यान गडचिरोली सामान्य रूग्णालयात मृत्यु झाला. Harshad Dandawar, Sahil Kosamsile, Sahil Ganeshkar
पुढील तपास सावलीचे पोलीस निरिक्षक पुल्लुरवार यांचे मार्गदर्शनात सहा. फौजदार चरणदास मडावी, पोशि अमोल गणफाडे, पोशि मोहन दासरवार करीत आहेत.