मूल (प्रतिनिधी) : मूल तालुक्यात काही ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने मूल तालुक्यात खडबड उडाली आहे. सदर धक्के हे भूकंपाचे की पुन्हा काही असे चर्चा आता मूल शहरात रंगत आहे mul
कोणी फोनवर बोलत होते तर कोणी झोपून असताना बेड हललाने झोपेतून उठल्याचे सांगण्यात येत आहे. सदर सौम्य भूकंपाच्या धक्यामुळे मूल शहरात चर्चेला उद्दान आली असून भूकंपाचे झटके की पुन्हा काही असा चर्चा आता मूल शहरांमध्ये रंगत असले आहे. याबाबत सोशल मीडियावर आमच्याकडे भूकंपाचे सौम्य धक्का बसल्याची चर्चा सुरू झालेली आहे. mild earthquake
प्रशासनाची माहिती
तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.
या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी . यांनी केले आहे.