सुधीर मुनगंटीवारांचे मंत्रीपद : भाजपाचे धक्कातंत्र कि फडणवीसांचे षडयंत्र! Ministerial post

Ministerial post
Ministerial post

भोजराज गोवर्धन, मूल
चंद्रपूर जिल्हयाचे लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पदाची हुलकावणी दिली. सलग सातवेळा विदर्भातून विजयी होण्यांचा विक्रम करणारे, विरोधी पक्षानी आणि पक्षातंर्गत विरोधीकांनी मुनगंटीवार यांना आमदारकीपासूनच रोखण्याचा प्रयत्न आपल्या वक्तृत्व, नेतृत्व व विकासकामासोबतच कार्यशैलीने हानून पाडणारे सुधीर मुनगंटीवार आता माजी मंत्री राहणार आहे. Sudhir Mungantiwar

सुधीर मुनगंटीवार यांचा सांसदीय कामाचा दिर्घ अनुभव, मंत्रीपदावर केलेली उत्तम कामगीरी, या कामगीरीचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला गौरव पहाता यावेळी त्यांना चांगला ‘‘पोर्टफोलीओ’’ मिळेल अशी जिल्हयातील सर्वांनाच खात्री होती, मात्र जंबो मंत्रीमंडळात मुनगंटीवार यांचे नांव नसल्यांचे दिसताच, त्यांच्या चाहत्यात खुद्द विरोधी पक्षातील नेत्यांतही अस्वस्थता निर्माण झाल्यांचे चित्र समाजमाध्यमातील प्रतिक्रियावरून दिसत होते.

भाजपा काही बड्या नेत्यांना मंत्रीपदापासून दूर करीत धक्कातंत्र वापरेल अशी शक्यता माध्यमात बऱ्यापैकी  चर्चील्या जात होती. मात्र मुनगंटीवार यांनी केलेले चंद्रपूर जिल्हयातील विकास कामे, त्यांनी मंत्रीपदाला दिलेला न्याय, यामुळे या धक्कातंत्रात सुधीरभाऊ नसेल अशीच शक्यता होती. मात्र मंत्रीमंडळाच्या विस्तारात अनपेक्षितपणे सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कापल्यांने अनेकांना धक्का बसला. पक्षाचे अंतर्गत चंद्रपूर जिल्हयात सुधीर मुनगंटीवार विरूध्द हसंराज अहिर अशी खुली गटबाजी आहे.  जेष्ठ नेते असलेले सुधीर मुनगंटीवार आपल्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतात, याच भावनेतून, देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार यांना डावलण्याचे प्रयत्न करतात अशी वारंवार चर्चा होती. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावाडे यांचा ‘‘राजकीय गेम’’ देवेंद्र फडणवीस यांनी केल्यांचे खुले बोलले जात होते. आपल्या अनोख्या कार्यशैलीने सुधीर मुनगंटीवार यांचा गेम मात्र यापूर्वी त्यांना करता आला नव्हता. 2019 मध्येच त्यांना आमदारकीच्या तिकीटापासून वंचित ठेवण्याचाही प्रयत्न झाला होता, मंत्री मंडळात दुसऱ्या-तिसऱ्या  स्थानावर असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना अखेरच्या क्षणी 48 व्या क्रमांकावर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

2024 च्या विधानसभेतही त्यांना पराभूत करण्यांचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात मुनगंटीवार विरोधकांना यश आले नसले तरी, मंत्रीपद देतांना त्यांचा पत्ता कट केल्यांने जिल्हयात नाराजीचा सूर पसरला आहे. सुंठीवाचून खोकला गेल्यांने, मुनगंटीवार विरोधक मात्र दिवाळी साजरी करीत आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद न मिळणे, हा भाजपाचे धक्कातंत्र होते कि, फडणवीसाचे षडयंत्र यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.