रेती तस्करांवर मूलच्या तालुका प्रशासनाची मेहरनजर? Sand smuggler

Sand smuggler
Sand smuggler

रेती घाटाचा लिलाव नसतांनाही अनेक ठिकाणी रेती साठा

मूल (प्रतिनिधी) : मूल तालुक्यात रेती तस्करीने उच्छाद मांडला आहे. स्थानिक महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष कि मिलीभगत हे कळायला मार्ग नसले तरी, एका बड्या कंपनीने मूल तहसिल कार्यालयाच्या अगदी तीन कि.मी. परिक्षेत्रात हजारो ब्रास रेतीचा साठा केला असल्यांचे उघड झाल्यांने, मूल तहसिल प्रशासनाच्या प्रामाणीकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Sand smuggler

मूल एम. आय. डी. सी. परिसरातील एका कंपनीने मूल तालुक्यातील एका नदीघाटातुन हजारो ब्रास रेती साठा जमा करून ठेवलेला आहे. मूलच्या 2 स्थानिक रेती तस्कर वाहतूकदाराचे माध्यमातून ही रेती चोरी केल्याची खुली चर्चा या परिसरात आहे. मूल तालुक्यातील हायवा मालक, जेसीबी मालकांकडून ही रेती चोरी या कंपनीकरीता केली जात असल्यांचा आरोप आहे. एम. आय. डि. सी. मध्ये तयार होत असलेले सिमेंट रस्ते आणि एका बड्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामाकरीता या चोरीच्या रेतीचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. Mul

चंद्रपूर जिल्हयात सध्या रेती घाटाचे​ लिलाव झालेले नाही. अशा परिस्थितीत हजारो ब्रास रेती, दिवस-रात्र उत्खनन करून, वाहतूक करीत असतांना मूलच्या तहसिल प्रशासनाला दिसू नये? यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

याबाबत मूलचे तहसिलदार मृदुला मोरे यांचेशी संपर्क साधुन, मरेगांव येथील हजारो ब्रास रेती साठ्याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी मूल येथील नदी घाटांचा लिलाव झालेला नाही त्यामुळे मूलच्या नदीची रेती नसल्याचे सांगितले, परंतु सदर रेती साठ्याची चौकशी करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

उल्लेखनीय म्हणजे, लहान-लहान रेती वाहतूक करणार्यांकडून बड्या रकमेचे दंड वसुल करणारे तालुका प्रशासन, बड्या रेती तस्कारांवर मेहरबानी दाखवित आहेत असाही आरोप होत आहे.