अन्यथा तिव्र आंदोलन करू : आकाश येसनकर
मूल (प्रतिनिधी): शहरातील वॉर्ड क्रमांक 15 आणि 16 येथे पाणी व विज व्यवस्थेसारख्या मूलभूत सुविधांकडे नगर पालीकेने दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर समस्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करून अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी दिला आहे. Mul
वॉर्ड क्रमांक 16 मधील हनुमान मंदिराजवळ सार्वजनिक शौचालयाची नितांत गरज आहे मात्र पाण्याची व विजेची सोय नसल्यामुळे संडास वापरणे कठीण बनले आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्य समस्याही निर्माण होण्याचा शक्यता आहे. या परिस्थितीत सुधारणा करून पाणी आणि लाईटच्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे. वॉर्ड क्रमांक 15 मधील बाल विकास शाळा परिसरातील प्रकाश व्यवस्थेचा अभाव असुन विद्यार्थी आणि नागरिकांना यासमस्येनुळे त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी सौर उर्जेवर आधारित पथदिवे बसवून हा परिसर प्रकाशमान करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. सदर समस्येचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांनी नगर पालीकेकडे दिले असुन तात्काळ समस्या सोडविण्याची विनंती केली आहे. यावेळी राहुल बघमारे, मायाबाई टेकाम, जयश्री सोयाम, अनुसया कोडापे, काजल गाजेवार, गणूबाई मट्टे, शालू मडावी उपस्थित होते. Nationalist Congress Party