मराठी शाळा टिकविण्यांचे समाजासमोर आव्हान ! आमदार सुधाकर अडबाले Friendship gathering

Friendship gathering
Friendship gathering

नवभारत विद्यालय व कन्या विद्यालयाचे स्नेहसम्मेलनात प्रतिपादन

मूल (प्रतिनिधी): मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आहे. मात्र मराठी शाळा टिकली तरच मराठी भाषा टिकणार आहे, बहुजनांच्या लेकरांना शिक्षणाची दारे उघडी ठेवायची असेल तर, मराठी शाळा टिकविण्यांचे समाजासमोर आव्हान असणार आहे असे मत आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. ते शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने आयोजीत नवभारत विद्यालय व नवभारत कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत स्नेहसम्मेंलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. MLA Sudhakar Adabale

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शशीकांत धर्माधिकारी, सहसचिव ते. क. कापगाते, कार्य. सदस्य प्रभाकर पुल्लकवार, सेवानिवृत्त प्राचार्य गंगाधर कुनघाडकर, माजी सिनेट सदस्य सुनिल शेरकी विमाशीचे तालुका अध्यक्ष ढवस सर यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. अल्का वरगंटीवार, नवभारत विद्यालय व्याहाडचे मुख्याध्यापक भगत व्यासपिठावर उपस्थित होते.  Navbhārat vidyālaya & kanyā vidyālaya

शिक्षण प्रसारक मंडळाचे चंद्रपूर जिल्हयात शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे, येथील शिक्षकांचा दर्जाही चांगला आहे, मात्र शासनाने शिक्षकांना अशैक्षणिक कार्य देवू नये असे मतही आमदार अडबाले यांनी व्यक्त केले. चांगल्या दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यांचा आमचा प्रयत्न आहे, शालेय अध्यापनासोबतच विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाकरीता स्नेहसम्मेंलनाचा उपक्रक स्तुत्य असल्यांचे अध्यक्षस्थानावरून अॅड. अनिल वैरागडे यांनी बोलतांना सांगीतले.

स्वागत गितांनी यावेळी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कलाशिक्षक कार्तीक नंदूरकर यांनी तयार केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे लोगोचे अनावरण आमदार अडबाले व अॅड. अनिल वैरागडे यांचे हस्ते करण्यात आले.  Anil Vairagade स्नेहसम्मेलनानिमीत्त विद्यार्थानी चित्रीत केलेल्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन आमदार सुधाकर अडबाले यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नवभारत विद्यालयाचे शिक्षक निलेश माथनकर, प्रतिमा उमक यांनी तर आभार प्रदर्शन नवभारत कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक विजय सिध्दावार यांनी केले. यावेळी नवभारत विद्यालय आणि कन्या विद्यालयाचे शिक्षकवृंद कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.