वाघाच्या हल्लात युवा शेतकऱ्यांचा मृत्यु tiger attack

tiger attack
tiger attack

मूल तालुक्यातील चितेगांव शेतशिवारातील घटना

मूल (तालुका प्रतिनिधी): शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मूल तालुक्यातील चितेगांव शेतशिवारात शनिवारी सकाळी 9 वाजता दरम्यान घडली. शेषराव पांडुरंग नागोशे वय 36 वर्षे रा. चितेगांव असे वाघच्या हल्लात ठार झालेल्या युवा शेतकऱ्यांचे नांव आहे. Chitegaon Mul

tiger attack1
tiger attack1

मूल तालुक्यातील मौजा चितेगांव शेतशिवारात पांडुरंग नागोशे यांची शेती आहे, याशेतात भाजीपाला लागवड केलेली आहे. शनिवार सकाळी उभ्या भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी शेषराव शेतामध्ये गेला होता, दरम्यान शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने शेषराव वर हल्ला करून ठार केले, शेषराव घरी परत न आल्याने शेषरावचे वडील पांडुरंग नागोशे शेतात गेल्यावर सदर घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावात माहिती दिली. सदर घटना सावली वनपरिक्षेत्रातील उमानदीच्या बाजुला घडली मात्र वाघाने शेषरावचे शव उमानदीच्या दुसऱ्या  बाजुला मूल वनपरिक्षेत्रात ओढत आणले. सदर घटनेमुळे चितेगांव परिसरात भितीचे वातारण निर्माण झाले आहे. घटनास्थळाला चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे, मूलचे प्रभारी क्षेत्र सहा. ए. आर. नालमवार, केळझरचे क्षेत्र सहा. पडवे, मूलचे वनरक्षक एस. आर. ठाकुर यांनी भेट देवुन पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. Sheshrav Nagoshe

वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेषराव नागोशे यांच्या पत्नीकडे 50 हजार रूपयाचे तात्काळ आर्थीक मदत वनविभागाकडुन करण्यात आली. Chichpalli Forest