येथील गांधी चौकातील घटना
मूल (प्रतिनिधी): मित्रासोबत दुचाकीने गांधी चौकात जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीला मागुन धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच ठार तर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर मार्गावरील आशिष प्लायवुड जवळ सकाळी 9 वाजता दरम्यान घडली. गणेश शंकर मडावी वय 32 वर्षे रा. मूल असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नांव आहे तर सुनिल एकनाथ काकडे हा गंभीर जखमी झाला आहे. Ganesh Madavi

मूल येथील वार्ड क्रं. 17 येथील गणेश शंकर मडावी वय 32 वर्षे हा दुचाकी एम एच 34 ए एस 8014 या हिरो कंपनीच्या सि डी डॉनने मित्र सुनिल एकनाथ काकडे याला घेवुन गांधी चौक येथे जात होता, दरम्यान ट्रक क्रं. सी जी 08 ए टी 7057 चे चालक विजय रामुलाल उईके वय 34 वर्षे याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला मागुन धडक दिली, या अपघातात दुचाकी चालक गणेश शंकर मडावी वय 32 वर्षे हा जागीच ठार झाला तर सुनिल एकनाथ काकडे हा गंभीर जखमी झाला, जखमीला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला हलविण्यात आले. Mul Accident
ट्रक चालक विजय रामुलाल उईके रा. दरेसका ता. सालेकसा Gondia यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे कलम 106 (1), 281, 125 (ब) भा. न्या. संहीता सहकलम 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे पुढील तपास परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक तथा मूल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर करीत आहे. Police Station Mul









