बल्लारपूर विधानसभा क्षेत्र मागासलेला : खासदार प्रतिभा धानोरकर Ballarpur Assembly Constituency

Ballarpur Assembly Constituency
Ballarpur Assembly Constituency

पत्रकार परिषदेत व्यक्त केले मत 

मूल (प्रतिनिधी): तालुक्यात सुरू असलेल्या जलजिवन मिशनच्या कामांमुळे गावातील चांगले  रस्ते नाल्याफोडुन कामे केल्या जात आहे, अनेक गावात पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे, क्षेत्रात अनेक समस्या आवासुन उभ्या आहे, परंतु  गेल्या अनेक वर्षापासुन क्षेत्राचे लोकप्रतिनिधीत्व करीत असलेल्यानी याकडे दुर्लक्ष केल्याने बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अजुनही मागासलेला आहे. यापुढे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकडे लक्ष घालुन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्याकडे भर देवुन असे मत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केल्या. MP Pratibha Dhanorkar

मूल येथील उपविभागीय कार्यालयात आयोजीत केलेल्या आढावा बैठक पार पाडुन विश्राम गृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती धानोरकर बोलत होत्या. मूल-चंद्रपूर मार्गाचे चौपदरीकरण व्हावे अशी आपली इच्छा असुन यासंबधाने व इतरही मुद्दे घेवुन 29 एप्रिल रोजी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी Nitin Gadkari यांचेसोबत बैठक घेत आहे, याबैठकीत सकारात्मक निर्णय होईल असा मला विश्वास आहे. यासोबतच केंद्रीय  रेल्वे मंत्री नामदार अश्वीनी वैष्णव Railway Minister Ashwini Vaishnaw यांच्याशी चर्चा करून मूल रेल्वे स्टेशनवर इतर राज्यात जाणाऱ्या गाडयांचा थांबा देण्याबाबत चर्चा करून गाडी थांबा देण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. Water supply disrupted

यावेळी माजी आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती घनश्याम येनुरकर, कॉंग्रेसचे नेते राजु पाटील मारकवार, संरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल मुरकुटे उपस्थित होते.