मूल तालुक्यातील भादुर्णी येथील घटना
मूल (प्रतिनिधी) : तेंदुपत्ता तोडण्यासाठी भादुर्णा येथील बफर झोन क्षेत्रातीत जंगलात गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजता दरम्यान घडली. भुमेश्वरी दिपक भेंडारे असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या महिलेचे नांव आहे. Bhumeshwari Bhendhare
मूल तालुक्यातील भादुर्णा येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी भुमेश्वरी हिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे सोबत झाला,काही दिवस केवाडा (पेठ) येथे राहिल्यानंतर भुमेश्वरी आपले वडीलाकडे भादुर्णा येथे राहायला आली, नंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती—पत्नी मिळेल ते कामे करून आपला उदरनिर्वाह करीत असताना सोमवारी सकाळी तेंदुपत्ता तोडण्यासाठी आई, वडील आणि पत्तीसह बफर क्षेत्रातील भादुर्णा जंगलात सकाळी 7 वाजता दरम्यान गेली होती, तेंदुपत्ता तोडत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने भुमेश्वरीवर झडप घेवुन हल्ला करून जागीच ठार केला, दरम्यान जवळच असलेल्या आई, वडील आणि पतीने आरडाओरड केल्याने वाघ पळुन गेला. सदर घटनेची माहिती गावकयांना आणि वनविभागाला देण्यात आली, Bhadurni Mul
घटनास्थळावर वनविभागाचे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल होवुन पंचनामा केला. व शव उत्तरीय तपासणीकरीता मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. Police Forest
वाघाच्या हल्लात चंद्रपूर जिल्हयात 2 दिवसात 5 महिलांचा जिव गेलेला आहे. यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.