मूल—राजोली मार्गावरील घटना
मूल (तालुका प्रतिनिधी) : सिंदेवाही वरून मूलकडे येणाऱ्या ट्रॅक आणि काळी पिवळी टाटा मॅजिकमध्ये झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 12 जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजता दरम्यान घडली. निर्दोष प्रभाकर मोहुर्ले वय 42 वर्षे रा. राजोली वाहन चालक—मालक, आणि मनाबाई देवाजी सिडाम वय 75 वर्षे रा. सरडपार ता. सिंदेवाही असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. Mul-Sindewahi
मूल सिंदेवाही, नागपूर, ब्रम्हपुरी यामार्गावर मोठया प्रमाणावर रहदारी असते, दरम्यान मंगळवारी दुपारी 3 वाजता दरम्यान सिंदेवाही वरून मूलकडे येणाया काळीपिवळी टाटा मॅजिक क्रं. एम एच 34 डी 2396 आणि त्याच दिशेने येणाया ट्रॅक क्रं. एम एच 40 डी एन 8524 या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात निर्दोष प्रभाकर मोहुर्ले वय 42 वर्षे रा. राजोली वाहन चालक—मालक, आणि मनाबाई देवाजी सिडाम वय 75 वर्षे रा. सरडपार ता. सिंदेवाही ठार झाले. तर श्रावण शंकर चापले वय 55 रा. भेंडाळा, अंजनाबाई निलंकठ आभारे वय 35 वर्षे रा. उसेगांव, संदीप सुर्यभान आमले रा. नागपूर, रामदास हजारे वय 31 वर्षे रा. जयरामपूर, मारोती दुम्मेवार रा. जयरामपूर, शोभा मोहुर्ले वय 40 वर्षे रा. मोरवाही, उज्वला राउत वय 31 वर्षे रा. मोरवाही, पुजा गेडाम वय 27 वर्षे रा. राजोली, मारोती वाघाडे वय 14 वर्षे रा. हळदी, आनंदाबाई भगत वय 70 वर्षे रा. हिरापूर, उज्वल राकेश जुमडे वय 8 वर्षे, शितल राकेश जुमडे वय 7 वर्षे असे जखमींचे नांव आहे. जण जखमी झाले. पोलीस घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला व जखमीना मूल उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करून काहीना चंद्रपूर रेफर करण्यात आले.
Nirdosh Mohurle, Manabai Sidam