वाघाच्या हल्लात एक जण ठार Tiger attack

Forest
Forest

मूल तालुक्यातील भादुर्णी येथील घटना : एकाच आठवडयात दोन ठार

मूल (प्रतिनिधी): शेळयासाठी चारा आणायला गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील भादुर्णा क्रं. 1 मधील कक्ष क्रं. 1008 मध्ये घडली. रूषी शिंगाजी पेंदोर वय 65 वर्षे रा. भादुर्णा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे. Bhadurna

Rushi Pendor
Rushi Pendor

मूल तालुक्यातील मौजा भादुर्णा येथील रूषी शिंगाजी पेंदोर वय 65 वर्षे हे कुटुंबासह राहतात. घरी शेळी पालन करीत असल्याने शेळयांसाठी चारा आणायला ते वनविभागाच्या बफर क्षेत्रातील भादुर्णा क्रं. 1 मधील कक्ष क्रं. 1008 मध्ये गेले होते, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले, दरम्यान रूषी पेंदोर हे शनिवारी रात्रौ होवुनही घरी परत न आल्याने कुटुंबियांनी वनविभागाच्या बफर क्षेत्राच्या अधिकाÚयांना माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने आज रविवारी सकाळी शोधाशोध केली असता, रूषी पेंदोर यांचा अर्धे वााघाने खालेला मृतदेह आढळुन आला.
घटनास्थळावर वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर आणि वनविभागाचे कर्मचारी व प्रभारी पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी आपल्या पथकासह दाखल होवुन पंचनामा केला. व शव उत्तरीय तपासणीकरीता मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. Rushi Pendor

वाघाच्या हल्लात भादुर्णा परिसरात एकाच आठवडयात दोन जणाचा मृत्यु झाल्याने परिसरात वनविभागाप्रती तिव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. वनविभागाने मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ 50 हजार रूपयाची आर्थीक मदत केलेली आहे Forest

वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा:- सरपंच प्रियंका नर्मलवार
मूल तालुक्यातील भादुर्णा येथील भुमेश्वरी भेंडारे यांचा 12 मे रोजी तेंदुपत्ता तोडतांना वाघाच्या हल्यात ठार झाली, तर शनिवारी रूषी पेंदोर यांचेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले, सदर घटना एकाचा आठवडयात घडली असुन सदर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावे अशी मागणी उश्राळाच्या सरपंच प्रियंका नर्मलवार यांनी वनविभागाकडे केली आहे.