वाघाच्या हल्लात 2 जण ठार Tiger attack

Tiger attack
Tiger attack

भगवानपूर वनपरिक्षेत्रातील घटना

मूल (निनाद शेन्डे): सरपणासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना भगवानपूर वनपरिक्षेत्रात घडली. संजिवनी संजय मॅकलवार वय 45 वर्षे रा. चिरोली असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या महिलेचे नांव आहेत तर दुसऱ्या घटनेत शेळयांना चराईसाठी घेवुन गेलेल्या शेळक्यावर वाघाने हल्ला करून ठार केले, सुरेश मंगरू सोपनकर वय 40 वर्षे रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे. sanjivani myakalwar, Suresh Sopankar

Tiger attack1
Tiger attack1

कोळसा आणि बोटेझरी यागावाचे पुनर्वसन भवनापूर येथे करण्यात आलेे आहे., प्रादेशिक वनविभाग आणि वनविकास महामंडळाच्या अतिशय घनदाट जंगलातुन यागावांमध्ये जावे लागते, दरम्यान मंगळवारी सकाळी 7 वाजता दरम्यान चिरोली हेटी येथील संजिवनी संजय मॅकलवार, संजय मॅकलवार आणि वार्डातील काही नागरीक सरपणासाठी भगवानपूर वनविकास महामंडळाच्या जंगलातील कक्ष क्रं. 524 मध्ये गेले होते, दरम्यान सरपण जमा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने संजिवनी संजय मॅकलवार हिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. जवळ असलेले पती आणि नागरीकांनी आरडाओरड केल्याने वाघ तिथुन पळुन गेला. दुसऱ्या घटनेत सकाळी 10 वाजताच्या दरम्यान सुरेश मंगरू सोपनकर वय 40 वर्षे रा. कांतापेठ हे स्वतःच्या घरच्या शेळया चराईसाठी भगवानपूर कक्ष क्रं. 524 मध्ये गेले होते, दरम्यान शेळया चरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सुरेशवर हल्ला करून जागीच ठार केले. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना माहिती होताच गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालुन मृतकाच्या कुटुंबाची पालपोषणाची जबाबदार वनविकास महामंडळाने स्विकारावी, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, भगवानपूर, टोलेवाही, कांतापेठ, जानाळा आणि आगडी जंगलालगत असलेल्या शेतशिवार परिसराला सौर कुंपन व जाळीचे कुंपन करून देण्यात यावेे, कांतापेठ ते म्हसबोडन शेतशिवार परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याला खडीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्याचे निवेदन मूल पंचायत समितीचे माजी सभापती तुळशिराम कुंभारे, माजी सदस्या वर्षा लोनबले, सामाजिक कार्यकर्ते राजु वाढई, टोलेवाहीच्या सरपंच वैशाली निकाडे, भगवानपूरचे सरपंच सचिन गरमडे यांनी विभागीय व्यवस्थापक वन प्रकल्प विभाग चंद्रपूर यांना दिले, मागण्या तात्काळ मंजुर करण्याचे आश्वासन विभागीय व्यवस्थापक जी. ए. मोटकर यांनी दिले.
घटनास्थळाला वनविकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक आर. एस. कदम, वनपरिक्षेत्राधिकारी एस. बी. बोथे, वनपाल शिंदे, पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी व पोलीस पथक, प्राणी व सर्पमित्र उमेशसिंह झिरे, वनरक्षक गव्हारे, उमेश गवई घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केले. व मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उतरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर शव कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. Bhagvanpur Forest

यावेळी वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मृत्तकाच्या कुटुंबियांना 30 हजार रूपयाचे आर्थीक मदत केली. एका आठवडयातील ही तिसरी घटना आहे. तर 17 दिवसातील 11 वी घटना आहे. यामुळे जंगल शेजारी राहणाऱ्या नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. Mul FDCM