सेवा पंधरवडा अभियानांतर्गत मूल येथे आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

Health and blood donation camp
Health and blood donation camp

उपजिल्हा रूग्णालयात महिलांसाठी सर्वसमावेशक तपासणी

मूल (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात “सेवा पंधरवडा” अभियानांतर्गत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे. शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. MLA Mungantiwar
महिलांच्या सर्वांगीण आरोग्य संवर्धनासोबतच पोषण आणि निरोगी जीवनशैलीबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातुन सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन सकाळी 8 वाजता पासुन तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिबीर चालणार आहे, शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, अनिमिया, क्षयरोग, स्त्रीरोग यांसारख्या आजारांचे निदान, गर्भवती महिलांची विशेष तपासणी, रक्त तपासणी, सिकलसेल तपासणी यासह मुलींना आरोग्यविषयक मोफत सल्ला दिला जाणार आहे. याशिबीरादरम्यान रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी माता व बालसुरक्षा कार्ड, आयुष्मान भारत योजनेचा लाभ, पोषणपूरक आहार मार्गदर्शन आणि निरोगी आरोग्याबाबत आवश्यक माहिती या शिबिरात उपलब्ध होणार आहे. शिबिरात येताना महिलांनी आधार कार्ड, आभा कार्ड तसेच पिएमजेएवाय कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.Health and blood donation camp
शिबीरात मोठया संख्येने मातृशक्तीनी उपस्थित राहून शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंदु मारगोनवार, शहराध्यक्ष प्रविण मोहर्ले, माजी शहराध्यक्ष प्रभााकर भोयर, तालुका महामंत्री संजय येनुरकर, बंडु नर्मलवार, गुरूदास भेंडारे, दादाजी येरणे, जितु टिंगुसले, प्रशांत बोबाटे, महिला तालुकाध्यक्ष अर्चना बल्लावार, मनिषा गांडलेवार, श्रीधर पाकमोडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पंकज लाडवे यांनी केले आहे. Mul Chandrapue