पैस्यासाठीच खुन केल्याची आरोपीकडुन कबुली Murder

Murder
Murder

सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची निघृन हत्या

मूल (प्रतिनिधी): गावातील एका तरूणासोबत सावली मार्गावरील एका धाब्यावर जेवन करण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची निघृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्रौ 8 वाजता दरम्यान घडली. सुनिल कालीदास गेडाम वय 60 वर्षे असे निघृण हत्या केलेल्या सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाचे नांव आहे तर किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद वय 24 वर्षे रा. टेकाडी असे आरोपीचे नांव आहे. Sunil Gedam

मूल तालुक्यातील टेकाडी येथील किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुनिल कालीदास गेडाम हे सावली मार्गावरील रानसंपन्न हॉटेलमध्ये जेवन करण्यासाठी शुक्रवारी रात्रौ 7 वाजता दरम्यान गेले होते. जेवन केल्यानंतर परत जात असताना सुनिल गेडाम आणि किस्मत सय्यद यांच्यात पैस्यावरून वाद झाला, त्यानंतर किस्मत सय्यद यांने काही युवकांच्या मदतीने सुनिल गेडाम यांची निघृन हत्या केली. व मरेगांव-टेकाडी मार्गावरील नाल्यात मृतदेह फेकुन दिले. Kismat sayyad

दरम्यान सुनिल गेडाम हे उशीर होवुनही घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोधाशोध केली असता आकापूर जवळील वळण मार्गावर सुनिल गेडाम यांची पल्सर दुचाकी, मोबाईल आणि चप्पल दिसुन आली. कुटुंबियांनी मूल पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली. मूल पोलीसांनी संशयीत म्हणुन किस्मत मोहम्मद सय्यद याला ताब्यात घेतले असता त्यांनी पैस्याच्या वादावरून खुन केल्याचे मान्य केले, मूल पोलीसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला व मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. Mul Chndrapur

मूल पोलीस स्टेशन येथे आरोपी विरूध्द विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आमले, पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहे. Murder