सरसकट पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश Chief Minister Devendra Fadnavis

Chief Minister Devendra Fadnavis
Chief Minister Devendra Fadnavis

मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची मूल येथे माहिती

भोजराज गोवर्धन, मूल
मराठवाडयात मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे, त्यादृष्टीकोनातुन प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याची आदेश दिलेले आहे, पंचनामे करतांना फार कायदयावर बोट ठेवुन, नियमावर बोट ठेवुन लोकांना त्रास होईल असे वागु नका, सर्व नुकसानीची माहिती आमचेकडे आल्यानंतर काय मदत करता येईल ते सरकार नक्की करे अशी प्रतिक्रीया राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते घरघुती कार्यक्रमासाठी मूल येथे आले असता त्यांनी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली. Chief Minister Devendra Fadnavis

Chief Minister Devendra Fadnavis1
Chief Minister Devendra Fadnavis1

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतिने कॉफी टेबल बुकाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हाचे पालकमंत्री नामदार डॉ. अशोक उईके, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, राजुराचे आमदार देवराव भोंगडे, वरोराचे आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते. Minister Dr. Ashok Uike, MLA Sudhir Mungantiwar

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ज्याकुटुंबियांच्या घरी पाणी घुसले त्यांना जेवनाची उत्तम व्यवस्था, पाण्याची सोय आणि जनावरांना चाऱ्यांची व्यवस्था करून देण्यासाठी प्रशासनाला सांगितले आहे. त्यासोबतच प्रशासनाकडुन 10 हजार रूपये, किट व अन्नधान्य देणे सुरू झालेले आहे, खालची यंत्रणा योग्य पध्दतीने काम करीत आहे की नाही याकडे सुध्दा लक्ष देण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, त्यासोबत काही भागात त्यांनाही दौरे करण्यासाठी सांगीतले आहे. परतीच्या पावसात प्रशासनाने अलर्ट मोडवर राहुन कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची व्यवस्था करण्यास प्रशासनाला सांगीतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगीतले. Mul