खेडी-गोंडपिपरी मार्गावरील जुनासुर्ला येथील घटना
मूल (प्रतिनिधी) : दुचाकीने गोंडपिपरी येथे किटकनाशक आणण्यासाठी जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली यामध्ये दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना खेडी गोंडपिपरी मार्गावरील जुनासुर्ला येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघातात सारंग गंडाटे वय २६ वर्षे रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला. प्रियांशु गंडाटे वय २३ वर्षे रा. पेंढरी मक्ता याचा मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लंकेश समर्थ रा. मुंडाळा हा गंभीर जखमी असून त्यांचा चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. Junasurla
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील सारंग गंडाटे, प्रियांशु गंडाटे आणी लंकेश समर्थ हे दुचाकी क्रं. एम एम 34 जे 3879 या वाहनाने गोंडपिपरी येथे किटकनाशक आणण्यासाठी जात होते, दरम्यान विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रक क्रं. 40 डीसी 1785 या वाहनाने जुनासुर्ला जवळ दुचाकीला जबर धडक दिली. याअपघातात सारंग गंडाटे वय 26 वर्षे रा. पेंढारी मक्ता याचा जागीच मृत्यु झाला प्रियांशु गंडाटे वय 23 वर्षे हा मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यु झाला. तर लंकेश समर्थ रा. मुंडाळा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना चंद्रपूर येेथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. Sarang Gandate, Priyanshu Gandate मूल पोलीस घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला, व जखमींना मूल येथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले तर मृतकाचे शव उत्तरीय तपासणीकरीता मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. Gondpipri Khedi
मूल पोलीस स्टेशन येथे ट्रक चालकाविरूध्द विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, पोलीस उपनिरीक्षक तानु रायपुरे करीत आहे. Mul Police Station