माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या पाठपुराव्याचे फलीत
मूल (प्रतिनिधी) : गत 7 वर्षापासुन मूल-चंद्रपूर महामार्गाचे काम वेगवेगळया कारणामुळे रखडलेले होते, यामार्गावर मोठया प्रमाणावर अपघात होत असल्याने मूल-चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीच्या पुढाकारातुन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचेकडे सदर मागणी रेटुन धरली, दरम्यान 1 ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर ते मूल महामार्ग निर्मीतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेे, दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला यामार्गाचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करण्याचे आदेशही दिल्याची सुत्राची माहिती आहे. Mul-Chandrapur Highway

गडचिरोली मूल चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरील गडचिरोली ते मूल पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्यात आलेले आहे, मात्र मूल ते चंद्रपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न गेल्या 7 वर्षापासुन शासन दरबारी प्रलंबित होता, यामार्गावर अनेक खड्डे पडलेले आहे, यामुळे रात्रीच्या वेळेस खड्डे दिसुन येत नसल्याने अनेकदा अपघात झालेला आहे, चार वर्षात यामार्गावर झालेल्या अपघातात 90 निरअपराध व्यक्तींचा जिव गेलेला आहे, तर 40 जण गंभीर जखमी झाले. मूल चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीच्या माध्यमातुन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्याकडे सदर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी केलेली होती, श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे वारंवार या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे यासाठी प्रयतनशील होत्या, 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूल येथे आले, यावेळी श्रीमती शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मूल-चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीने मागणी केली असता, 1 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभुत सुविधा समितीच्या बैठकीत चंद्रपूर ते मूल महामार्ग निर्मीतीचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश देण्यात आला असुन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेशही दिल्याची सुत्राची माहिती आहे. CM Devendra Fadnavis
मूल-चंद्रपूर यामहामार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित होता, मात्र श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामार्गाला हिरवी झेंडी दिलेली आहे, दरम्यान मूल-चंद्रपूर चौपदीरकरण निर्माण संघर्ष समितीने श्रीमती शोभताई फडणवीस यांचे आभार मानले. ex minister Shobhatai Fadnavis