मूल नगर पालीकेच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती Mul Municipal Council

Mul Municipal Council
Mul Municipal Council

ओबीसी महिला प्रवर्गाच्या आरक्षणामुळे इच्छुक महिलांची गर्दी वाढणार

भोजराज गोवर्धन, मूल
मागील 4 वर्षापासुन मूल नगर पालीकेवर प्रशासकराज सुरू आहे, मात्र सोमवारी 6 ऑक्टोंबर रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने नगर पालीकेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर केले असुन मूल नगर पालीका अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सन 2016 मध्ये मूल नगर पालीकेचे आरक्षण सर्वसाधारण महिलासाठी राखीव होते, तेव्हा भाजपाच्या प्रा. रत्नमाला भोयर विजयी झाल्या होत्या, यापुढेही मूल नगर पालीकेचा कारभार महिलेच्या नेतृत्वाखाली पार पाडल्या जाणार आहे. मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपा आणि कॉग्रेस पक्षाकडुन तगडे उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.Reserved for OBC women category

30 डिसेंबर 2021 रोजी मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्ठात आला, राजकारणी नगर पालिकेची निवडणुक लागेल या अपेक्षेनी चातकासारखे वाट बघत होते, जवळजवळ 4 वर्षाचा कार्यकाळ लोटत असतांनाच, 6 ऑक्टोंबर रोजी मूल नगर पालीकेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर झाले, ओबीसी महिला प्रवर्गातील महिला मूल नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत, सन 2016 मध्ये पार पडलेल्या मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते, यावर्षी होणाऱ्या नगर पालीकेचे आरक्षण हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने पुन्हा मूल नगर पालीकेचे नेतृत्व महिलेकडेच राहणार आहे. यामुळे अनेक वर्षापासुन नगराध्यक्षाचे स्वप्न बघणाऱ्यांना मात्र याआरक्षणामुळे चांगलाच धक्का बसला आहे. Mul Municipal Council

मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये अनेक महिला इच्छुक आहेत, मूल नगर पालीकेवर भाजपाची सत्ता कायम राहावी यासाठी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार तर कॉग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष रावत प्रयत्नशील राहणार आहेत, Mul