मूल मारोडा मार्गावरील घटना
मूल (प्रतिनिधी) : शेतीसंदर्भातील ऑनलाईनेच काम करून परत जात असतांना दोन दुचाकीची समोरासमोरील धडक बसल्याने 2 जण जागीच ठार झाल्याची घटना मूल-मारोडा मार्गावरील बल्की देव जवळ बुधवारी दुपारी 1 वाजता दरम्यान घडली. यश देविदास शेंडे वय 22 वर्षे, देविदास कवडु शेंडे वय 45 वर्षे रा. मारोडा हे घटनास्थळी ठार झाले तर वासुदेव किसन सहारे वय 54 वर्षे रा. शिवापूर चक याना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात नेत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यु झाला. Three people killed
मूल तालुक्यातील मारोडा येथील यश देविदास शेंडे आणि वडील देविदास कवडु शेंडे हे दोघेही वडील आणि मुलगा शेती संदर्भातील ऑनलाईनचे काम करण्यासाठी मूल येथे दुचाकी क्रं. एम एच 34 बी एक्स 8863 या दुचाकीने आले होते, काम पुर्ण करून ते दुचाकीने परत जात होते, दरम्यान शिवापूर चक येथील वासुदेव सहारे हे दुचाकी क्रं. एम एच 34 ए वाय 4332 या दुचाकीने मूलच्या दिशेने येत असतांना मूल-मारोडा मार्गावरील बल्की देव जवळ दुचाकीचा समोरासमोर धडक बसल्याने यश देविदास शेंडे वय 22 वर्षे, देविदास कवडु शेंडे वय 45 वर्षे रा. मारोडा हे घटनास्थळी ठार झाले तर वासुदेव किसन सहारे रा. शिवापूर चक याना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात नेत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यु झाला. मूल पोलीस घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला. उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणी करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. Mul Maroda