अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी वेडसर इसमाचा मृत्यु accident

accident
accident

गोंडसावरी जवळील घटना

मूल (प्रतिनिधी) : प्लॉस्टीकच्या चुंगळयांचा गठोळा धरून मूल-चंद्रपूुर मार्गाने पायी जात असलेल्या एका अनोळखी वेडसर इसमाला मूल कडुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरधार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला, त्याला चंद्रपूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले, दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना 10 ऑक्टोंबर रोजी त्याचा मृत्यु झाला. accident

पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोंबर रोजी मुल ते चंद्रपूर मार्गावरील मौजा गोंडसावरी गावाचे बस स्टॉप जवळील फलकाजवळ अनोळखी वेडसर ईसम वय अंदाजे ५५ वर्ष हा डोक्यावर प्लॉस्टीकच्या चुंगळीचा गठोळा धरून मुल ते चंद्रपूर रोडने पायदळ जात असतानां गोंडसावरी गावाचे फलकासमोर मुल कडून येणाÚया अज्ञात वाहनाच्या चालकाचे आपले वाहन भरधाव वेगात चालवत आणून सदर अज्ञात ईसमास धडक दिली, आणि चंद्रपूरकडे आपले वाहन घेवूण निघूण गेला. सदर ईसमाचे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचाराकरीता चंद्रपूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांनाच 10 ऑक्टोंबर रोजी त्याचा मृत्यु झाला. सदर अनोळखी इसमाचे शासकीय रूग्णालय चंद्रपूर येथे शवविच्छेनदन करण्यात आले असुन चंद्रपूर येथेच ठेवण्यात आलेले आहे. सदर अनोळखी ईसमाचे वय अंदाजे ५५ वर्ष असुन अंगात पांढरा शर्ट व सिमेंट रंगाचा गुडघ्यापर्यंत फोल्ड केलेला फुलपॅन्ट घातलेला, डोक्याचे केस दाढी मीशीचे केस पिकलेले बांधा मजबूत उंची ५ फुट ४ ईंच अशा वर्णनाचा आहे. सदर इसमाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन मुल येथे संपर्क साधून मृतकची ओळख पटवून घेण्याचे आवाहन मूल पोलीस स्टेशनच्या वतिने करण्यात आले आहे. Chandrapur

फिर्यादीच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरूध्द कलम १०६ (१), २८१ भा. न्या. सं. सहकलम १८४, १३४/१७७ मोवाका. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानु रायपूरे, पोलीस अंमलदार आतीश मेश्राम करीत आहे. Mul Police Station