मूल तालुक्यातील कवळपेठ येथील घटना
मूल (प्रतिनिधी): शौचास गेलेल्या एका इसमावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील कवळपेठ येथे बुधवारी सकाळी 6 वाजता दरम्यान घडली. रामचंद्र धिवरू भेंडारे वय 55 वर्षे रा. कवळपेठ असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नांव आहे. Ramchandra Bhendare#injured

मूल तालुक्यातील मौजा कवळपेठ हे गांव जंगला लगत आहे, यापरिसरात वन्यप्राण्यांची मोठी रेलचेल नेहमीच असते, यामुळे वनविभाग नेहमीच नागरीकांना सावधानतेचा इशारा देत असतो, दरम्यान कवळपेठ येथील रामचंद्र धिवरू भेंडारे हे बुधवारी सकाळी 6 वाजता दरम्यान शौचविधी करण्यासाठी गावाबाहेर गेले असता दबा धरून बसलेल्या अस्वलांने त्यांच्यावर हल्ला केला, त्यांनी आरडाओरड करून अस्वलापासुन आपली सुटका केली, अस्वलाच्या हल्लात मात्र रामचंद्र गंभीर जखमी झाला, त्याला उपचारार्थ मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, मूल येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले, घटनेची माहिती होताच चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होवुन घटनेची माहिती घेतली, वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. bear attack
गंभीर जखमी असलेल्या रामचंद्र भेंडारे यांच्या कुटुंबियांना 10 हजार रूपयाची आर्थीक मदत वनविभागाने केलेली आहे. Kawalpeth







