ऋतीक गोयल कॉंग्रेसचे प्रबळ दावेदार Hrithik Goyal

Hrithik Goyal
Hrithik Goyal

मूल (प्रतिनिधी): जेसीआयच्या माध्यमातुन सामाजिक कार्याला सुरूवात केलेल्या ऋतीक गोयल यांची प्रभाग क्रं. 5 साठी प्रबळ दावेदारी मानली जात आहे. त्यांची भाजपाच्या उमेदवाराशी थेट लढत होईल असे चिन्ह सध्यातरी दिसुन येत आहे. Hrithik Goyal

मूल नगर परिषदेची निवडणुक येत्या 2 डिसेंबर रोजी होवु घातली आहे. सर्वसाधारण गटासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रं. 5 ब या राखीव गटातुन ऋतीक गोयल यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, राज्याचे सरचिटणीस संतोष रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली व नगर पालीकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांच्या नेतृत्वात ऋतीक गोयल यांनी काही दिवसापुर्वी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यामागे मागे मोठी युवाफळी आहे, Ward No. 5 B युवकांना सोबत घेवुन त्यांनी जेसीआयचे कार्य गावोगावी सक्षमपणे राबविले, मोफत आरोग्य शिबीर, गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप यासारखे उपक्रम ऋतीक गोयल यांनी गावोगावी राबविले आहे. अतिशय शांतप्रिय स्वभाव असलेल्या ऋतीक गोयल यांनी मूलच्या जनतेची सेवा करण्यासाठी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रं. 5 मधुन कॉंग्रेस पक्षाकडुन निवडणुक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रभाग क्रं. 5 अ गट हे नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव असल्याने यासाठी कॉंग्रेस पक्षाकडुन सक्षम उमेदवारांचा शोध घेत आहेत.